बांगलादेशातील मंदिरांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – महाआरतीद्वारे हिंदु संघटना-हिंदूंची मागणी 

बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने  टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले असून सरकारविरोधी आंदोलन, हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून ३ ठार !; आता बदलापूर ते पनवेल १० मिनिटांत !…

दिंडोशीमधील बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर काही कामगार गंभीर घायाळ झाले आहेत.

श्री गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करणार !

खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाचे कारण कशाला हवे ? एरव्हीच सर्व रस्ते खड्डेमुक्त असायला हवेत, असे वाटणारे प्रशासन हवे !

पुणे शहरात गणेशोत्सवात अनुचित घटना टाळण्यासाठी ७ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !

एका शहरात सहस्रो पोलिसांचा बंदोबस्त करावा लागणे आणि दहशतीखाली गणेशोत्सव साजरा करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

राज्यातील ३६ सहस्र ९७८ अंगणवाडीमध्ये सौर ऊर्जा देण्यात येणार !

राज्यशासनाच्या स्वमालकीच्या आणि विजेची सुविधा नसलेल्या ३६ सहस्र ९७८ अंगणवाड्यांना सौर ऊर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय ५ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कोंढवा (पुणे) येथील अनधिकृत दूरभाष केंद्राच्या प्रकरणी ए.टी.एस्.कडून ३ जणांना अटक !

एवढी वर्षे अनधिकृत दूरभाष केंद्र चालू असूनही पोलिसांना त्याचा काहीच सुगावा कसा लागला नाही ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ?

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

मानव-निर्मित वस्तूंपेक्षा देवाने केलेली निर्मिती अधिक आनंददायी !

‘मानवाने कितीही कौशल्य वापरून बांधलेल्या इमारती बघण्यापेक्षा निसर्गाच्या आकाश, वायू, प्रकाश, पाणी, भूमी, वनस्पती यांसारख्या विविध घटकांना अनुभवल्यावर आपल्याला अधिक चांगले वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, ते सर्व देवाने बनवलेले आहे.’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत श्री गणेशचतुर्थी विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १७ सप्टेंबर २०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ सप्‍टेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !