संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचे साहाय्य ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लोक भावनांचा विचार करून लवकरात लवकर नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वेर्णा (गोवा) पठारावर ‘सनबर्न’चे आयोजन करण्यास लोटली ग्रामसभेत विरोध

ग्रामसभेत ‘सनबर्न’चे आयोजन, कचरा प्रकल्प आणि रोमी लिपी यांसंबंधी प्रश्न हाताळण्यात येणार असल्याने ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

नवी मुंबईत पकडलेले ५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ ‘एन्.सी.बी.’कडून नष्ट !

मागील काही वर्षांत नवी मुंबई परिसरातून कह्यात घेतलेले ५ सहस्र ४८५ किलो अमली पदार्थ अमली पदार्थविरोधी पथकाने (नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो) नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या अमली पदार्थांचे मूल्य ५२ कोटी रुपये इतके होते.

म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून ३ बांगलादेशी नागरिक पसार

केंद्राच्या छताचे पत्रे उचकटून संरक्षक भिंतीवरून उडी मारून ते पसार झाले. या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

‘म्हादई प्रवाह’च्या दुसर्‍या बैठकीत म्हादई नदीचे निरीक्षण केल्याच्या सूत्राचा उल्लेख नाही

या बैठकीत कर्नाटकने म्हादईसंबंधी महाराष्ट्राच्या प्रस्तावाला घेतलेल्या आक्षेपांचा उल्लेख आहे; मात्र म्हादई आणि गोवा यासंबंधी एकाही सूत्राचा उल्लेख नाही.

‘राज्यघटना पालटणार’, असे खोटे सांगून समाजात विष पेरले जात आहे ! – विजय गवाळे, संस्थापक अध्यक्ष बौद्ध युवक संघटना

काँग्रेसने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतःच्या लाभासाठी वापर केला आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत, तसेच अन्य एका पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव केला.

अमली पदार्थांच्या व्यवसायात गाेमंतकियांचा वाढता सहभाग

चालू वर्षाच्या ६ मासांच्या अहवालानुसार अमली पदार्थ व्यवसायाशी निगडीत कह्यात घेतलेल्यांमध्ये ४२ टक्के  गोमंतकीय नागरिक आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८० टक्के अधिक आहे.

Karnataka Hindus Attack : गाडीविषयी प्रश्‍न विचारल्‍यामुळे मुसलमानांकडून हिंदु युवकांवर आक्रमण !

रस्‍त्‍याच्‍या मध्‍यभागी ट्रक उभा केल्‍यावरून प्रश्‍न विचारल्‍यामुळे मेहबूब, सय्‍यद, सलमान आणि शेख यांनी २ हिंदु युवक रघु रेड्डी आणि राहुल रेड्डी यांच्‍यावर आक्रमण केल्‍याची घटना शहरातील कोडला क्रॉसजवळ घडली आहे.

China ​Border Villages : चीनने भारतासह ९ देशांच्या सीमांवर वसवली १७० गावे !

भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे का आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !

कर्नाटकातील ५ बांगलादेशी निर्वासित हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे देण्यात आले भारतीय नागरिकत्व !

रायचूर येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.