साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !
श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !
अनेकदा गुरु-शिष्य परंपरेकडे केवळ आध्यात्मिक अंगाने पाहिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. गुरु-शिष्य परंपरेचा प्रभाव सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी समाजातील सर्व घटकांवर होतो. राष्ट्रोत्थानाचे कार्य पुन्हा एकदा गुरु-शिष्य परंपरेला पेलावे लागणार आहे.
आदर्श शिष्य होण्यासाठी साधकाने कोणते गुण अंगी बाणवावेत ?
ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘सात्त्विक चित्रकला, मूर्तीकला, रांगोळी, मेंदी, शिवणकला, पाककला, संगीत, नृत्य, नाट्य’, अशा विविध कला, तसेच विविध विद्या यांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी साधकांना अविरत मार्गदर्शन करत आहेत.
गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ !