हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !

‘अखिल मानवजातीचे कल्याण करणारा हिंदु राष्ट्र-स्थापनेचा काळ समीप आहे; मात्र ‘आपणांस तो सहजपणे अनुभवायला मिळेल’, असे नाही. त्यासाठी ईश्वरावरील दृढ भक्ती, सत् साठी त्यागाची सिद्धता, मनाची सर्वांगीण सिद्धता अशा सद्गुणांची शिदोरी आपल्यासोबत असली पाहिजे. ती साठवण्यासाठी गुरुपौर्णिमेसारखी अद्वितीय संधी नाही ! गुरुपौर्णिमेनिमित्त एक सहस्र पटींनी कार्यरत गुरुतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी तन, मन आणि धन यांपैकी ज्या जमेल, त्या मार्गाने या उत्सवात, तसेच त्यातील सेवेत सहभागी व्हा ! गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’, अशी प्रार्थना तळमळीने करा. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्था
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !