पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

‘सनातन संस्थेचे ३ मोक्षगुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, हे सगुण रूपातील ईश्वराचे अवतारच आहेत. सूर्याकडून जे किरण पृथ्वीकडे येत असतात, त्यांतील ‘अतिनील किरण (Ultraviolet Rays)’ मनुष्याला सर्वांत अधिक हानी पोचवतात. ईश्वरनिर्मित पृथ्वीवर असलेल्या प्राणवायूच्या थरामुळे हे किरण पृथ्वीपर्यंत तेवढ्या तीव्रतेने पोचत नाहीत. त्यामुळे मनुष्य आणि प्राणीमात्र यांचे रक्षण होते. त्याचप्रमाणे वाईट शक्ती साधकांना त्रास देण्यासाठी येतात; पण त्या साधकांपर्यंत पोचू शकत नाहीत. सनातन संस्थेचे हे ३ मोक्षगुरु वाईट शक्तींमुळे साधकांना होणारा त्रास आधी स्वतःवर घेतात आणि तो पचवतात. हे ३ गुरु वाईट शक्तींची आक्रमणे परतवून लावतात. सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांना वाईट शक्ती काही अंशीच त्रास देतात.
‘धर्मसंस्थापना करणे’, म्हणजे सूक्ष्मातील वाईट शक्तींचे प्रचंड आक्रमण पचवणे होय ! कलियुगातील अवतारांचे हे खरे कार्य समाज आणि साधक यांपासून गुप्त रहाते; कारण वाईट शक्ती डोळ्यांना दिसत नाहीत. सनातनच्या साधकांचे अहोभाग्य आहे की, गुरुदेवांसारखे अवतारी पुरुष त्यांना ‘गुरु’ म्हणून लाभले आहेत. धर्मसंस्थापनेसाठी वैकुंठातून पृथ्वीवर आलेल्या सनातनच्या ३ मोक्षगुरूंचे गुणवर्णन पंचमहाभूते आणि निसर्ग, हेसुद्धा करतात.
वर्ष २०२४ मध्ये हा संदेश महर्षि साधकांपर्यंत पोचवत आहेत. श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पृथ्वीवरील गोमंतक भागात (गोवा येथे) भूवैकुंठरूपी सनातन आश्रमात विराजमान आहेत. त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी ‘श्रीसत्शक्ति’ या भूवैकुंठात राहून तो (रामनाथी) आश्रम आणि तेथे रहाणारे साधक यांचे परिपालन करत आहेत, तर दुसर्या आध्यात्मिक उत्तराधिकारी ‘श्रीचित्शक्ति’ या दक्षिण भारतातील ‘भूकैलास’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कांची क्षेत्रात विराजमान आहेत. ग्रहगतीच्या पलीकडे जाऊन साधकांसाठी अहोरात्र झटणार्या, वाईट शक्तींशी झुंज देऊन साधकांचे रक्षण करणार्या, साधकांचे प्रारब्धभोग जाळणार्या आणि त्यांची विहंगम मार्गाने आध्यात्मिक उन्नती करून घेणार्या सनातन संस्थेच्या तिन्ही मोक्षगुरूंना आम्हा सप्तर्षींचे गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन !’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून (१३.७.२०२४, सकाळी १०.३०))
|
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !