पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याची झडती !

या वेळी पिस्तूल, ३ काडतुसे आणि ‘लँड क्रूझर’ ही चारचाकी गाडी जप्त केली आहे. ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली होती. मनोरमा खेडकर यांना शस्त्राचा परवाना देतांना घालण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याचे उघड झाले आहे.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर फेरीवाला अन् वाहनकोंडी मुक्त करण्याचे आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ?

बिहारी सुरक्षारक्षकाकडून अधिकारी महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

महिलांसाठी असुरक्षित मुंबई !

एका मतदान केंद्रासाठी १ सहस्र ५०० मतदार ठेवणार !

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसूचींचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकार्‍यांसमवेत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुकार्याच्या वृद्धीसाठी त्याग करण्याचा संकल्प दिवस असतो. व्यापक स्वरूपाचे गुरुकार्य म्हणजे हिंदु धर्माचे कार्य आणि सध्याच्या काळानुसार व्यापक गुरुकार्य म्हणजे धर्मसंस्थापनेचे कार्य अर्थात् हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य !