
मुंबई – ३८ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर तिला मारण्याचा प्रयत्न करणार्या एका सुरक्षारक्षकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला ‘ब्रँड मॅनेजमेंट अँड बिजनेस डेव्हलपमेंट’ आस्थापनाची वरिष्ठ कर्मचारी आहे. आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली.
आरोपी एका ‘प्रॉडक्शन हाऊस’मध्ये सुरक्षारक्षक होता. शेजारच्या बंगल्यामधील पीडितेकडील मांजरे त्याच्या बंगल्यात आल्याचा बहाणा करून आरोपीने महिलेला बोलावून तिच्यावर बळजोरी करण्याचा प्रयत्न केला. तिने जोरदार प्रतिकार केला असता त्याने तिच्यावर चाकूने आक्रमण केले. महिलेच्या मानेवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. नंतर आरोपीने तिला ‘प्रॉडक्शन हाऊस’च्या एका खोलीत बंद केले. तेव्हा तिने मित्राला फोन करून साहाय्य मागितले.
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !