Indian Flag in Jammu & Kashmir :‘ओम मंडली’च्या वतीने जम्मू-काश्मीर राज्यात ‘वन्दे मातरम्’ गाऊन तिरंगा फडकावला !

जम्मू-काश्मीर राज्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवलिंग आणि तिरंग्या झेंड्यासह सहभागी ‘ओम मंडली’चे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर – रायपूर (छत्तीसगड) येथील ‘ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्थान’ यांच्या वतीने जम्मू-काश्मीर राज्यात शिवलिंगासमवेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात ‘ओम’च्या झेंड्यासमवेत तिरंगा झेंडाही फडकावण्यात आला. या वेळी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यात आले आणि ‘भारत माता की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणाही देण्यात आल्या. या यात्रेत भारतीय सैन्यातील सैनिक सहभागी होते. भारत सरकारने काश्मीरमधील तोडलेल्या मंदिरांचे पुनर्निमाण करावे आणि काश्मिरी पंडितांना नवीन घरे तात्काळ बांधून मिळावीत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. देवकी मैय्या यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देतांना कोल्हापूर येथील सदस्य श्री. नरेश चौटानी म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीर राज्यात गेल्या काही कालावधीपासून आतंकवाद्यांची आक्रमणे वाढली असूनही अत्यंत निर्भयपणे ‘ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्थान’ने ही शोभायात्रा काढून भारतियांच्या मनातील देशभक्ती जागृत केली. या प्रकारची यात्रा संपूर्ण देशभरात काढण्यात येत असून यात प्रत्येक राज्यातील सदस्य सहभागी होत आहेत.’’