उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – मागील काही दिवस कोकणसह उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेची लाट आल्याचे आता घोषित करण्यात आले आहे; परंतु अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही ? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर पाठवलेल्या संदेशात उपस्थित केला आहे.

उन्हातून मुलांना शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना सुटी घोषित करण्याचे निर्देश द्यावेत, असे या संदेशात राज ठाकरे यांनी म्हटले आहे.