पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या तरुणीवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद !

पुणे – पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या तरुणीवर बलात्कार, तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. उपनिरीक्षकाने तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील एका रुग्णालयात गर्भपात केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८ वर्षे), रा. नागपूर) असे गुन्हा नोंद केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांध पोलिसांना बडतर्फच करायला हवे !