समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहिबुल्ला नदवी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्याचे टाळले !

रामपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना !

समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहिबुल्ला नदवी

रामपूर (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहिबुल्ला नदवी यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात मोहिबुल्ला नदवी यांनी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण न केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यानंतर नदवी तेथून घाईघाईने निघून गेल्याचे व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे. दलित-मुसलमान ऐक्याच्या अनुषंगाने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रम संपल्यानंतर एका पत्रकाराने नदवी यांना ‘तुम्ही आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प का अर्पण केले नाही ?, असा प्रश्‍न सवाल केला. यावर ते म्हणाले, ‘मी माझ्या पद्धतीने पुष्पहार घातला आहे.’ या उत्तराने पत्रकारांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा प्रश्‍न विचारला. यावर नदवी उत्तर देण्याचे टाळून जाऊ लागले. पत्रकार त्यांच्या मागे जाऊ लागल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले.

संपादकीय भूमिका

  • ‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे याविषयी तोंड उघडतील का ?