सरकारच्या ‘कोकण विकास महामंडळा’ची दुरवस्था : गुंतवणूक केलेली सर्व आस्थापने बंद !
कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात शिकणार्या अनिल फुंदे या विद्यार्थ्याला व्हॉट्सॲप गटात पाठवलेली राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी अनिल फुंदे यांस लाथा-बुक्क्याने आणि आसंदी यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.
गोव्यात ६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खाण व्यवसाय चालू होणार आहे. खनिज उत्खननासाठी अनुमती मिळालेले ‘वेदांता’ हे पहिले ‘लिज’धारक आस्थापन आहे.
प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही.
मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.
पोलीस अधिकारी स्वत:च्या मुलांवर लक्ष ठेवू शकत नसतील, तर ते समाजातील गुन्हेगारांवर कसा वचक बसवणार ?
कराड पोलिसांनी मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावरील गोकाक पेट्रोलपंपाजवळ चारचाकी बोलेरो गाडीतून ७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कणसे यांना कह्यात घेण्यात आले आहे.
विद्यापिठाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सादर केला. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.
येथे होळी झाल्यावर दुसर्या दिवशी येणार्या-जाणार्या दूधवाल्यांकडून अडवून दूध घेणे, दूध न दिल्यास त्रास देणे अशी चुकीची प्रथा रूढ झाली होती. मुलांचे या संदर्भात प्रबोधन केल्यावर त्यांनी ही प्रथा बंदी केली आणि यासाठी श्री. नवनाथ कावळे यांनी दूध उपलब्ध करून दिले.
देवतांच्या दागिन्यांसह आता देवतांच्या मूर्तींचीही सहजपणे चोरी होत आहे, ही स्थिती पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !