पुण्यातील प्राचीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ३ देवतांच्या मूर्तींची चोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील टिळक रस्त्यावर प्रसिद्ध खजिना विहीर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. २५० वर्षे जुने असलेल्या या मंदिरात प्राचीन मूर्तीही आहेत. ८ मार्चच्या मध्यरात्री ३ अज्ञात व्यक्तींनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या गाभार्‍यात असलेल्या प्राचीन चांदीच्या मूर्ती चोरून नेल्या. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री गणपति आणि श्री तुळजाभवानीदेवी यांच्या मूर्तींचा समावेश आह. चोरांनी मंदिरातील भिंतीवर असलेले चांदीचे मखरही चोरून नेले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गौरव सिन्नरकर यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

संपादकीय भूमिका

  • देवतांच्या दागिन्यांसह आता देवतांच्या मूर्तींचीही सहजपणे चोरी होत आहे, ही स्थिती पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !