जिल्ह्यातील १७ कातळशिल्पांच्या विकासकामांसाठी ८८ लाख रुपयांचा निधी संमत

कातळशिल्प

रत्नागिरी – जिल्ह्यातील १७ कातळशिल्पांच्या व्यवस्थापन आणि विकासकामाच्या ४ कोटी ३२ लाख १९ सहस्र १३६ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या कामाकरता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यानुसार मे. गजराज कस्ट्रक्शन, लातूर यांच्या न्यूनतम निविदा प्रस्तावास, तसेच ४ कोटी ९३ लाख ६८ सहस्र ५२७ रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या स्मारकांच्या व्यवस्थापन आणि विकासकामाकरता आवश्यक असे ८८ लाख ३० सहस्र ०३१ इतकी रक्कम देण्याची विनंती संचालक, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी केली होती. या रकमेपैकी ८२ लाख ३४ सहस्र १६३ जतन दुरुस्ती कामाची असून ५ लाख ९५ सहस्र ८६८ इतकी रक्कम संबंधित संवर्धक वास्तुविशारद मानधनाची आहे. या रकमेची मान्यता शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे.