बीड – जिल्हाधिकार्यांनी फेरी काढण्यास आणि सभा घेण्यास अनुमती नाकारलेली असतांनाही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात उमरद फाटा येथे सभा घेतली अन् फेरी काढली होती. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणी मनोज जरांगेंसह २०० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.