Pune Drug Adict Girls : पुणे येथील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !

पंतप्रधान मोदी यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेचे घेतले दर्शन !  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी या वेळी ४८ सहस्र कोटी रुपांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले.  या वेळी त्यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन द्वारकेचे ‘स्कूबा डायव्हिंग’द्वारे जाऊन दर्शन घेतले.

Eating With NO FORKS : विदेशात हाताने भोजन करण्याच्या पद्धतीत वाढ !

हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचरणामागे आध्यात्मिक कारण आहे. याचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना जेव्हा समजेल, तेव्हा ते नक्कीच पालन करतील, हे यातून लक्षात येते ! विशेष म्हणजे यानंतरच पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय स्वतःच्या संस्कृतीचे पालन करू लागतील !

भारताने नेहमीच मालदीवच्या अडचणींच्या काळात साहाय्य केले ! – मारिया दिदी, माजी संरक्षणमंत्री, मालदीव

मालदीवचे भारतविरोधी आणि चीन समर्थक राष्ट्रपती मुईज्जू यांच्या हे लक्षात येत नाही, हे संतापजनक !

अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या घोषणापत्रात प्रथमच हिंदूंसाठी विशेष पान

अमेरिका कथित धर्मनिरपेक्ष राष्ट्र असले, तरी ते ख्रिस्ती धर्मालाच प्राधान्य देते, हे जगजाहीर आहे; कारण तेथे ख्रिस्ती बहुसंख्य आहेत. भारतात याउलट आहे, म्हणजे बहुसंख्य हिंदूंना कोणतेही महत्त्व नाही. आता हिंदूंची मते मिळवण्यासाठी हिंदूंचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न डेमोक्रॅटिक पक्ष करत आहे.

५ वर्षांच्या मुलाने शाळेजवळील दारूचे दुकान हटवण्यासाठी उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली जनहित याचिका !

एका ५ वर्षांच्या मुलाला अशी याचिका प्रविष्ट का करावी लागते ? प्रशासनाला ते कळत का नाही ?

FDA Revokes Licence of McDonald : ‘मॅकडोनाल्ड’च्या केडगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील दुकानाचा परवाना रहित !

असा प्रकार अन्यत्रच्या दुकानांमध्येही होत असणार, त्यांची पडताळणी का केली जात नाही किंवा केली जात असेल, तर कारवाई केली जात नाही, अशी शंका उपस्थित होते !

जागृत हिंदूंना दिशा देणे आवश्यक !

‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले