मालदीवच्या माजी संरक्षणमंत्री मारिया दिदी यांचे वक्तव्य
माले (मालदीव) – जेव्हा मालदीवला आवश्यकता होती, तेव्हा आमचा शेजारी देश म्हणजेच भारताने आम्हाला साहाय्य केले आहे. भारताने नेहमीच मालदीवच्या अडचणींच्या काळात साहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे वक्तव्य मालदीवच्या माजी संरक्षणमंत्री मारिया दिदी ‘फर्स्टपोस्ट डिफेन्स समिट’मध्ये केले. भारत आणि मालदीव यांच्यातील गेल्या २ मासांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
मारिया दिदी पुढे म्हणाल्या की, भारत त्याचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेलाही साहाय्य करतो. भारतासह शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध ठेवणे, हे आमच्या पक्षाचे सरकारचे पहिले उद्दीष्ट होते. मला आशा आहे की, भारत आणि मालदीव यांमधील संबंध सुधारतील, उभय देशांमधील परिस्थिती पहिल्यासारखी होईल.
संपादकीय भूमिकामालदीवचे भारतविरोधी आणि चीन समर्थक राष्ट्रपती मुईज्जू यांच्या हे लक्षात येत नाही, हे संतापजनक ! |