आगामी निवडणुकीत गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

‘जनसंवाद यात्रे’च्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे ४ फेब्रवारी या दिवशी जिल्हा दौर्‍यावर आले होते. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराजेश्वर’ मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.

पुढील १६ मासांत कर्करोग रुग्णालय उभारणार ! – आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा (CANCER HOSPITAL In GOA)

राज्यात एक लाख महिलांपैकी २ सहस्र ५०० महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून कर्करोगावरील लस विनाशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक कुटुंबांनी सर्वेक्षणास दिला नकार !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण पडताळण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे.

भूखंड विक्रीची विज्ञापने देणार्‍या ४१ जणांना ‘महारेरा’कडून नोटीस !

राज्यात भूखंड, घरे, इमारती यांच्या विक्रीसाठी ‘महारेरा’ची (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची) नोंदणी आवश्यक आहे. तसे न करता अनेक ठिकाणी भूखंडाचे तुकडे पाडून त्याविषयीची विक्री करण्याचे विज्ञापन दिले जाते.

पहिल्या रांगेतून न्यायमूर्तींना उठवल्याने सर्वच न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून गेले !

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात २ फेब्रुवारीच्या रात्री उद्घाटन कार्यक्रमात खंडपिठातील न्यायमूर्तींना सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. या न्यायमूर्तींना जागेवरून उठवण्यात आल्याने उपस्थित न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून निघून गेले.

गणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा नोंद !

लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांना रोखल्याच्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ‘मुस्लीम बोर्डिंग’चे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यासह ६०० हून अधिक संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अल्ताफला फाशीची शिक्षा द्या !

लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अल्पवयीन हिंदु मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ कुरेशी याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी येथील अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी या दिवशी फेरी काढून निषेध नोंदवण्यात आला.

संपादकीय : ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी !

‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांनी श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याविषयी भारतीय समाज नेहमीच त्यांचा ऋणी राहील !