गणी आजरेकर यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा नोंद !

अनधिकृत मदरसा कारवाईला अडथळा आणल्याचे प्रकरण

कोल्हापूर – लक्षतीर्थ वसाहत येथील अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांना रोखल्याच्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ३ फेब्रुवारी या दिवशी ‘मुस्लीम बोर्डिंग’चे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यासह ६०० हून अधिक संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गणी आजरेकर यांनी महापालिकेला घेराव घालून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

अनधिकृत मदरशाचे बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलीस गेले होते. गणी आजरेकरसह मुसलमान महिला आणि तरुण यांनी पथकाला तीव्र विरोध केला. या वेळी काही तरुणांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावबंदीचे उल्लंघन करून कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.