वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या अल्ताफला फाशीची शिक्षा द्या !

टेंभुर्णी येथे अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाच्या वतीने निषेध फेरी

प्रतिकात्मक छायाचित्र

टेंभुर्णी (जिल्हा सोलापूर) – लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अल्पवयीन हिंदु मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ कुरेशी याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी येथील अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी या दिवशी फेरी काढून निषेध नोंदवण्यात आला. या वेळी महिला, बालिका आणि नागरिक यांनी निषेधाचे फलक घेत घोषणा देत निषेध नोंदवला. या फेरीमध्ये संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष गजानन कांबळे, सचिव मनोज पलंगे, कार्याध्यक्ष आशुतोष पलंगे यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे लहान मुलीच्या हस्ते निवेदन देण्यात आले.