हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी अविरत प्रयत्न करणे आवश्यक ! – पू. राजूदासजी महाराज, महंत, हनुमानगढी, अयोध्या

हिंदु राष्ट्र नसेल, तर सनातन धर्मही सुरक्षित रहाणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी हिदु राष्ट्राची जोरदार मागणी केली पाहिजे. त्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अयोध्या येथील हनुमानगढीचे महंत पू. राजूदासजी महाराज यांनी केले.

ठाणे येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत असल्याचे वास्तव उघड !

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

नाशिक येथे आतंकवादी संघटनांना पैसे पुरवणार्‍याला अटक !

भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंधित असलेल्या हुजेफ अब्दुल अजीज शेख याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अनेक खासगी आस्थापनांत त्याची भागीदारी आहे.

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कांदळी (जिल्हा पुणे) येथील श्रीराममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘पितांबरी’च्या ‘देवभक्ती जय श्रीराम उपासना मसाला अगरबत्ती’चे लोर्कापण !

भगवान विष्णूला आवडणार्‍या फुलांमध्ये पारिजातकाचा समावेश आहे. ‘पारिजात’ हे फूल समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नांपैकी एक आहे’, असे म्हटले जाते. या फुलाचा सुगंध प्रभु श्रीरामालाही प्रिय आहे;

निपाणी (कर्नाटक) येथे शोभायात्रेला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली !

पोलिसांनी प्रथम २२ जानेवारीला अनुमती नाकारत २३ जानेवारीला शोभायात्रा काढा, अशी विनंती केली. यानुसार २३ ला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले; मात्र पोलिसांनी अचानक २३ जानेवारीलाही शोभायात्रेची अनुमती नाकारली.

कोल्हापूर येथे १०८ फूट उंचीच्या श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण !

सकल हिंदू समाजाच्या वतीने दसरा चौक येथे उभारण्यात आलेल्या १०८ फुटी श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारीला श्रीफळ वाढवून करण्यात आले.