ठाणे – श्री रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त गावदेवी मैदान येथे २० ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या तीन दिवसीय ‘रामायण महोत्सवा’त २१ जानेवारी या दिवशी पितांबरीचे नवीन उत्पादन असणार्या ‘देवभक्ती जय श्रीराम उपासना मसाला अगरबत्ती’चे लोर्कापण करण्यात आले. या वेळी गुरुदेव विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, ‘पितांबरी’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, ‘लाईफ इन्श्युरन्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया’चे विद्याधर सहस्रबुद्धे, टीजेएस्बी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, ‘एस्.एम्.सी.’ समुहाच्या मेहता, सृजन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नैना सहस्रबुद्धे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपचे प्रवक्ते सुजय पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. चापबाण हाती घेतलेली प्रभु श्रीरामाची भव्य मूर्ती मान्यवरांना भेट देण्यात आली.
भगवान विष्णूला आवडणार्या फुलांमध्ये पारिजातकाचा समावेश आहे. ‘पारिजात’ हे फूल समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नांपैकी एक आहे’, असे म्हटले जाते. या फुलाचा सुगंध प्रभु श्रीरामालाही प्रिय आहे; म्हणूनच या फुलाचा सुगंध आणि श्रीरामला प्रिय असणार्या अन्य घटकांचा वापर करून पितांबरीने ही अगरबत्ती सिद्ध केली आहे.