निपाणी (कर्नाटक) येथे शोभायात्रेला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली !

शोभायात्रेला अनुमती नाकारल्यावर श्रीराम मंदिराजवळ आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

निपाणी (कर्नाटक) – प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात सर्वत्र उत्साहात फेरी, शोभायात्रा काढण्यात आल्या. निपाणी येथेही श्रीराम सेनेच्या वतीने प्रारंभी २२ जानेवारीला शोभायात्रा काढण्यात येणार होती. पोलिसांनी प्रथम २२ जानेवारीला अनुमती नाकारत २३ जानेवारीला शोभायात्रा काढा, अशी विनंती केली. यानुसार २३ ला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले; मात्र पोलिसांनी अचानक २३ जानेवारीलाही शोभायात्रेची अनुमती नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी मिरवणुकीसाठी आणलेले साहित्य, विविध मूर्ती यांसह श्रीराम मंदिराशेजारी ठिय्या आंदोलन केले. (सार्‍या देशात शोभायात्रेच्या निमित्ताने मिरवणुका निघालेल्या असतांना केवळ कर्नाटक राज्यातील निपाणी येथे त्याला बंदी का ? कर्नाटक राज्यात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार हिंदूंना मिरवणुका काढण्यापासून वंचित ठेवून त्यांचा मूलभूत अधिकार काढून घेत आहे ! केंद्र सरकारने याची नाेंद घेऊन अशा प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी ! – संपादक)

या संदर्भात चिकोडी जिल्हाध्यक्ष अधिवक्ता निलेश हत्ती म्हणाले, ‘‘श्रीरामसेना हिंदुस्थानने २३ जानेवारीला भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते; मात्र अचानक पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली. केवळ हिंदूंच्याच सणांवर गंडांतर का आणले जात आहे ? पोलीसयंत्रणेने सरकारी आदेश असल्याचे सांगून अनुमती नाकारली; मात्र लेखी आदेशाची प्रत दाखवण्याची मागणी केली असता त्याविषयी टाळाटाळ केली जात आहे. सदर प्रकाराविषयी आम्ही शांत बसणार नसून केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत याची तक्रार करणार आहोत.’’

संपादकीय भूमिका 

  • हिंदूद्वेषी काँग्रेस सरकार
  • हिंदूंना त्यांचा मूलभूत अधिकार नाकारणार्‍या काँग्रेस सरकारच्या विरोधात पुरोगामी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !