‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! दोन व्यक्तींमधील ‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे, एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीकडून काहीतरी मागून घेणे. अशा मागण्यामुळे आपण इतरांचे देणेकरी होतो. त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी.
असे असले तरी, धर्मकार्यासाठी अर्पण मागणे, यामध्ये कुणाचाच स्वार्थ नसतो. त्यामुळे मागणारा आणि देणारा या दोघांचीही यामध्ये साधना होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.१.२०२४)