सांगली, २६ जानेवारी (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२४ ची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम ही २४ ते २८ जानेवारी या कालावधीत दुर्ग श्रीरायरेश्वर ते श्रीप्रतापगड (मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर) अशी होत आहे. या मोहिमेला जाणार्या धारकर्यांना गणपति मंदिराजवळ २४ जानेवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. अश्विनी कट्टी, श्री. जयतीर्थ कट्टी, सौ. शोभा गवळी, सौ. रूपा गवळी आणि श्री. महेश गवळी उपस्थित होते. श्री. जयतीर्थ कट्टी यांनी श्रीफळ वाढवून गाडीला ओवाळून पुष्पहार घातला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मिलिंद तानवडे, श्री. अनिल तानवडे, श्री. राजू पुजारी यांसह अन्य धारकरी उपस्थित होते. या प्रसंगी उद्योगपती राजू (शेठ) मेहता यांच्या हस्तेही श्रीफळ वाढवण्यात आले.