१. ‘आश्रमातील चित्रीकरण कक्षामध्ये गेल्यावर मला वेगळेच चैतन्य अनुभवता आले. चित्रीकरण कक्षातून बाहेर पडतांना मला चंदनाचा सुगंध आला.
२. आश्रम पहातांना ‘पवित्र तीर्थक्षेत्री आले आहे’, असे मला जाणवत होते.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयातील फलकावर असलेले प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) छायाचित्र कोणत्याही बाजूने पाहिल्यावर गुरुदेव आपल्याकडेच पहात असल्याचे मला जाणवले. ‘प्रत्यक्षातही मी कोठेही असले, तरी प.पू. गुरुदेवांचे माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे’, या विचाराने माझ्या संपूर्ण शरिरावर रोमांच येत होते.’
– सौ. ऋषिका ठाकूर, उरण, रायगड. (१५.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |