देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा !

देहलीच्या कर्तव्य पथावरील संचलनात उत्तरप्रदेशाच्या चित्ररथावर श्री रामललाचे रूप  !  

कर्तव्य पथावर उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचे चित्ररथ

नवी देहली – देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कर्तव्य पथावर सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन उपस्थित होते. यानंतर प्रतिवर्षीप्रमाणे भारताच्या तिन्हा सैन्यदलांचे संचलन, शस्त्रांचे प्रदर्शन, तसेच भारताच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरा यांचे दर्शन विविध माध्यमांतून घडवण्यात आले.

येथील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बनवण्यात आला होता, तर उत्तरप्रदेशचा चित्ररथ ‘अयोध्या : विकसित भारत-समृद्ध विरासत (वारसा)’ यावर आधारीत होता. उत्तरप्रदेशाच्या चित्ररथाच्या पुढील भागात श्री रामललाचे रूप दाखवण्यात आले होते. अन्य राज्यांनीही वेगवेगळ्या विषयानुरूप चित्ररथ सादर केले.