समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ३ प्रवासी ठार !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ३ प्रवासी ठार !

अमरावती – जिल्ह्यातील वाठोना शिवणी येथे समृद्धी महामार्गावर २५ जानेवारीच्या पहाटे ५ वाजता एका ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रॅव्हल्स अहिल्यानगरहून रायपूरकडे जात होती. त्या वेळी ट्रॅव्हल्सच्या चालकाला झोप लागल्याने टॅ्रव्हल्स बाजूच्या कंटनेरला धडकली. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.