महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार, आकृतीबंध निश्चित ! – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यात स्वतंत्र तालुक्यांच्या निर्मितीसाठी होत असलेल्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक आहे. मोठ्या, मध्यम आणि छोट्या तालुक्यांसाठी किती पदे असावीत ? याचा आकृतीबंध निश्चिती करण्यात आला आहे.

श्री गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची कामे चालू आहेत ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

परभणी जिल्ह्यातील धारासूर (ता. गंगाखेड) येथील प्राचीन श्री गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची, तसेच इतर आवश्यक कामे चालू आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत १८ डिसेंबर या दिवशी दिली.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर तोडगा काढू ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. इंद्रायणी नदीच्या परिसरात मोठे औद्योगिक कारखाने असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संमती दिली आहे.

सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव !

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

राज्यातील ९७ बसस्थानकांचे नूतनीकरण, तर १८६ बसस्थानकांचे ‘बीओटी’ होणार ! – दादाजी भुसे

राज्यातील ९७ बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून एकूण १८६ बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांनाच प्राधान्य असेल !

‘हिंदूंनो, मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालू नका; कारण हिंदु राष्ट्रात भारतीय भाषा या शाळेतील आणि सरकारी कारभाराचे माध्यम असतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनाची मैत्री दिव्‍याच्‍या ज्‍वालेसमान असणे !

दुर्जनदूषितमनसां पुंसां सुजनेऽपि नास्‍ति विश्‍वासः।
दुग्‍धेन दग्‍धवदनस्‍तक्रं फूत्‍कृत्‍य पामरः पिबति॥
अर्थ : दुर्जनाच्‍या अनुभवाने माणसाचे मन दूषित झाले की, त्‍याचा सज्‍जनावरचा विश्‍वाससुद्धा उडतो. दुधाने तोंड पोळले की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.

मराठी भाषा अभिजात करण्‍यासाठी कुणाच्‍या प्रमाणपत्राची आवश्‍यकता का भासते ? – महेश एलकुंचवार, ज्‍येष्‍ठ नाटककार

मराठी भाषेचा अभिजात दर्जा, हा सध्‍याचा ऐरणीवरचा प्रश्‍न झाला आहे; पण मराठी भाषा अभिजात करण्‍यासाठी कुणाच्‍या प्रमाणपत्राची आवश्‍यकता का भासते ? हा खरा प्रश्‍न आहे.