
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – परभणी जिल्ह्यातील धारासूर (ता. गंगाखेड) येथील प्राचीन श्री गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची, तसेच इतर आवश्यक कामे चालू आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत १८ डिसेंबर या दिवशी दिली. याविषयीचा प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या संरक्षित स्मारकाच्या जतन आणि संवर्धन यांच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात १४ कोटी ९५ लाख रुपयांची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी २ वर्षे कालावधी लागेल. याच्या दुसर्या टप्प्यात १३ कोटी ९८ लाख रुपये एवढ्या रकमेची कामे हाती घेण्याचे नियोजित आहे. तथापि मंदिराच्या जतन आणि दुरुस्ती या कामांमुळे भाविकांना दर्शनाची कोणतीही अडचणी येऊ नये, म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी अन् ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन भगवान महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या परिसरात करण्यात आलेली आहे.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !