जिल्‍ह्याच्‍या पर्यटन विकासासाठी आवश्‍यक तेवढा निधी देणार  ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटनमंत्री

कोल्‍हापूर हा पर्यटनाच्‍या दृष्‍टीने समृद्ध जिल्‍हा आहे. जिल्‍ह्यातील पर्यटन स्‍थळांची दुरुस्‍ती, जतन आणि संवर्धन करून जिल्‍ह्याचा पर्यटनदृष्‍ट्या विकास साधण्‍यासाठी निधी मागणीचा प्रस्‍ताव केंद्र सरकारकडे सादर करावा.

निळे (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ‘श्री विठलाईदेवी वि.का.स. सेवा सोसायटी मर्या.’च्‍या सभासदांना सनातनच्‍या उत्‍पादनांचे संच भेट !

निळे येथील ‘श्री विठलाईदेवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या.’च्‍या सभासदांना १२ टक्‍के लाभांश प्रदान करण्‍यात आला. श्री. उदयसिंह कोकरे-देसाई संस्‍थापक असलेल्‍या या सोसायटीच्‍या ६० सदस्‍यांना या प्रसंगी सनातन संस्‍थेच्‍या सात्त्विक उत्‍पादनांचे संच भेट देण्‍यात आले.

पदवीधर गटाच्‍या मतदार नोंदणी प्रक्रियेची ‘एस्.आय.टी.’च्‍या माध्‍यमातून चौकशी करावी ! – डॉ. मनीषा कायंदे, आमदार

मुंबई विद्यापिठाच्‍या नोंदणीकृत पदवीधर गटाच्‍या अधिसभा निवडणुकीसाठी यापूर्वी झालेल्‍या मतदार नोंदणी प्रक्रियेत पुष्‍कळ प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. त्‍यांची विशेष तपास पथकाद्वारे (‘एस्.आय.टी.’द्वारे) चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्‍या विधान परिषदेच्‍या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.

गोवा : कला अकादमी १० नोव्हेंबरला खुली होणार !

वर्ष २०२१ मध्ये कला अकादमी संकुलातील काही वास्तूंच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आले होते. यात खुल्या नाट्यगृहाचा सहभाग नव्हता. वर्ष २०२३ च्या जुलै मासात खुल्या नाट्यगृहाचे छप्पर कोसळले होते. खुल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अद्याप चालू करण्यात आलेले नाही.

पुणे मेट्रोच्‍या कामाचे प्रत्‍येक वेळी संरचनात्‍मक लेखापरीक्षण नको ! – श्रावण हर्डीकर, ‘महामेट्रो’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक

ट्रोच्‍या कामाचे प्रत्‍येक वेळी स्‍ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्‍मक लेखापरीक्षण) करणे बंधनकारक नाही. प्रत्‍येक कामाचे संरचनात्‍मक लेखापरीक्षण केल्‍यानंतरच ‘मेट्रो’ चालू केली जाते, असे ‘महामेट्रो’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

राजकारणी आणि साधक यांच्यातील मूलभूत भेद !

‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘इ-कचर्‍या’ची समस्‍या !

सध्‍याच्‍या काळात इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंची निर्मिती भरमसाठ वाढलेली आहे. त्‍यामध्‍ये संगणक, भ्रमणसंगणक, दूरदर्शन संच, ध्‍वनीयंत्रणा यांसह अनेक वस्‍तू असतात.

हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

उत्तराखंड राज्‍यातील ३० मदरशांमध्‍ये मुसलमानेतर विद्यार्थी इस्‍लामी शिक्षण घेत असल्‍याची माहिती उघड झाली आहे. आतापर्यंत अशा ७४९ विद्यार्थ्‍यांची माहिती मिळाली आहे. यांत सर्वाधिक हिंदु मुले आहेत.

हिंदु संस्‍कृती, धर्म आणि राष्‍ट्र यांची हानी करणार्‍या विचारांना हद्दपार करण्‍याच्‍या दृष्‍टीने दीपोत्‍सव !

राष्‍ट्राचे धन राष्‍ट्राकडेच ठेवणे आणि प्रामाणिकपणे धन कमावणे, हेच खरे लक्ष्मीपूजन !