नेवासे (अहिल्यानगर) येथील विकासकामांवरील स्थगिती उठवली !
स्थगिती उठवण्यासाठी आमदार गडाख यांच्या वतीने औरंगाबाद खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. संमत कामांवरील स्थगिती उठवण्याचा आदेश औरंगाबाद खंडपिठाने दिला आहे. त्यामुळे ७८ कोटी रुपयांच्या कामांना गती मिळणार आहे.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा !
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या विरोधात नंदुरबार येथे तक्रार प्रविष्ट !
सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून कोट्यवधी सनातन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी करणारी तक्रार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमींनी केली.
राज्यातील ९० टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे, टोलवसुलीवर लक्ष ठेवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
राज्यातील ९० टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवर मनसेची करडी नजर असणार आहे
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ !
केंद्रशासनाने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली आहे. आता हा भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के इतका झाला आहे.
गेल्या ३ मासांत २ सहस्र २०० हिंदु मुलींचे धर्मांतर झाले आहे ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), प्रसिद्ध कीर्तनकार
गावातील पुढार्यांनी शाळेतील भ्रमणभाषचा वापर बंद करून प्रत्येक गावामध्ये एक समिती स्थापन करावी. गावाकडे लक्ष द्यावे. गेल्या ३ मासांत २ सहस्र २०० हिंदु मुलींचे धर्मांतर झाले आहे.
विवियन सिल्व्हर यांचा मानवाधिकार !
मानवतेची हत्या करणार्या या आतंकवाद्यांविषयी लोकांना सहानुभूती वाटेल. अशा गांधीगिरी करणार्या जमातीमुळे जगातील सुसंस्कृत, सहिष्णु आणि शांतीप्रिय समाज नष्ट होईल. असे होऊ नये, यासाठी मानवाधिकारवाल्यांचा वैचारिक पराभव करून त्यांना आरसा दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
घटस्थापनेच्या दिवशी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या शिबिराचे आयोजन !
शिबिरात पथनाट्य, व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण यांचा समावेश होता. या वेळी ५२ महिला आणि युवक यांनी त्यात सहभाग घेतला.