उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या विरोधात नंदुरबार येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्मविरोधी वक्तव्ये केल्याचे प्रकरण

तक्रार देतांना उपस्थित धर्मप्रेमी

नंदुरबार – सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून कोट्यवधी सनातन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि साम्यवादी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी करणारी तक्रार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमींनी केली. मागील सप्ताहात ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या अंतर्गत येथे झालेल्या कार्यक्रमात याविषयी जागृती करण्यात आली होती.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश बागुल, विश्‍व हिंदू परिषदेचे सर्वश्री अजय कासार, मयूर चौधरी, आकाश गावित, हर्षल देसाई, चंद्रकांत भोई, जितेंद्र मराठे, निलेश पाटील, अधिवक्ता सुमित परदेशी उपस्थित होते.