इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे कर्नाटकातील कोडी मठाच्या स्वामीजींचे २ मासांपूर्वीचे भविष्य खरे होण्याची शक्यता !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘जगाच्या भूपटलावरून एक देश नाहीसा होईल’, असे भविष्य हासन जिल्ह्यातील हारनहल्ली कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी म्हणजे ‘कोडी श्री’ यांनी २ मासांपूर्वी वर्तवले होते. सध्या ज्यू राष्ट्र इस्रायल आणि इस्लामी राष्ट्र पॅलेस्टाईन यांच्यात भीषण युद्ध चालू असल्याचे पाहून कोडी श्री यांनी व्यक्त केलेली भविष्यवाणी खरी होत आहे, असेच वाटू लागले आहे.

कोडी श्री यांनी, ‘भूकंप, बाँबस्फोट, युद्धजन्य स्थिती, लोकांचे लोकांवर असलेले नियंत्रण नष्ट होऊन वेडे होणे, देह अशक्त झाल्यामुळे वाटेत पडून मरणे, देहाचा अवयवांवरील प्रभाव नष्ट होणे आणि जागतिक भूपटलावरून एक देश नष्ट होईल’, असे भविष्य सांगितले होते. युद्धाची भीती आणि पाऊस यांमुळे २ देश भूपटलावरून नष्ट होतील, असे भविष्य त्यांनी सांगितले होते.
संपादकीय भूमिकाहमासच्या आक्रमणानंतर इस्रायलने हमासला नष्ट करण्यासह गाझा पट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा चंग बांधला असल्याने हे भविष्य खरे ठरल्यास आश्चर्य वाटू नये ! |
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
आतंकवाद्यांनी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची केली रेकी !
Netanyahu On Gaza : गाझाच्या ७० टक्के भागावर नियंत्रण मिळवा ! – नेतान्याहू यांचा सैन्याला आदेश