नांदेडमधील शासकीय रुग्‍णालयात २४ घंट्यांत २४ रुग्‍णांचा मृत्‍यू !

यामध्‍ये १२ नवजात बालकांचा समावेश असून सर्पदंश आणि विषबाधा यांमुळे १२ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता यांनी ‘मृतांमध्‍ये बाहेरील रुग्‍णांचा अधिक समावेश होता’, असे स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

पुणे येथे ८ मासांत १४ सहस्र नागरिकांना श्‍वानदंश, सुदैवाने एकालाही ‘रेबीज’ नाही !

सहस्रो नागरिकांना कुत्र्यांचा दंश होऊनही त्‍यावर ठोस उपाययोजना न काढणारे असंवेदनशील प्रशासन !

समृद्धी महामार्गाच्‍या पथकर नाक्‍यावरील परप्रांतीय कर्मचार्‍यांना मनसैनिकांकडून मारहाण !

या प्रकरणाच्‍या विरोधात मनसेच्‍या नाशिक शहराध्‍यक्षा अक्षरा घोडके यांनी परप्रांतीय कर्मचार्‍यांना मारहाण केली. पथकर नाका बंद केला. येथे कार्यकर्त्‍यांची गर्दी झाल्‍याने महामार्गावर वाहतुकीची झालेली कोंडी पोलिसांनी सोडवली.

काशेवाडी (पुणे) येथे २ देशी गोवंश वाचवण्‍यात गोरक्षकांना यश !

गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्‍याची आवश्‍यक स्‍पष्‍ट करणारी घटना !

मराठा आरक्षणासाठी हिंदु महासभेच्‍या राजेंद्र तोरस्‍कर यांचे बेमुदत उपोषण !

श्री. राजेंद्र  तोरस्‍कर म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाची न्‍याय्‍य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्‍थित होते.

‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’, घटस्‍फोट यांसारख्‍या गोष्‍टी स्‍वीकारणे कठीण जाते ! – अभिनेते जितेंद्र

सद्य:स्‍थितीत ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता मुलामुलीने एकत्र रहाणे), ‘घटस्‍फोट’ या गोष्‍टी सामान्‍य वाटतात. मी लहान असतांना या गोष्‍टींचा विचारही करता येत नव्‍हता. घटस्‍फोट त्‍या काळी केवळ अमेरिकेत व्‍हायचे.

घरासमवेत अंगण आणि परिसर स्‍वच्‍छ ठेवा ! – कुमार आशीर्वाद, जिल्‍हाधिकारी

सोलापूर शहरात सिद्धेश्‍वर मंदिराकडील अडुसष्‍ठ लिंगांपैकी जिल्‍हा परिषद परिसरात असलेल्‍या एका ठिकाणाची जिल्‍हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्‍यासह अन्‍य अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्‍वच्‍छता केली.

‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्‍ह्यातील नावे वगळण्‍यासाठी मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

करंजे येथे भटकी मळा परिसरात ३० जुलै २०२३ या दिवशी भूमीच्‍या वादातून परस्‍परविरोधी तक्रार विटा पोलीस ठाण्‍यात नोंद झाल्‍या होत्‍या. यातील सूर्यवंशी मळ्‍यातील पुरोगामी युवक संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष गोपीनाथ सूर्यवंशी आणि त्‍यांचे वडील भानुदास सूर्यवंशी यांची नावे ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्‍या अंतर्गत नोंदवण्‍यात आली होती.

आदर्श नागरी पतसंस्‍थेतील कर्जदारांच्‍या १९ मालमत्तांच्‍या जप्‍तीला अनुमती !

आदर्श पतसंस्‍थेतील अपप्रकार उघड झाल्‍यानंतर सहकार खात्‍याने प्रशासक समितीची नियुक्‍ती केली आहे. या समितीने थकीत कर्जाच्‍या वसुलीला प्रारंभ केला आहे.

राष्‍ट्रघातकी जातीनिहाय जनगणना कशासाठी ?

आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्‍या जनतेला जातीजातींमध्‍ये विभागणे, हे राष्‍ट्रघातक आहे. त्‍यामुळे अशा गोष्‍टीला विरोध करणे नितांत आवश्‍यक आहे. तसेच जातीजातींमध्‍ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्‍यघटनेला धरून नाही.