पुणे – ‘राजीव गांधी सोसायटी’ समोरील काशेवाडी येथील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करण्याकरता काही गुरे आणलेली आहेत, अशी माहिती मानद पशू कल्याण अधिकारी राहुल कदम यांनी खडकी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी राहुल कदम यांच्यासह १ ऑक्टोबर या दिवशी सदर ठिकाणी धाड घातली. त्या वेळी त्या सोसायटीसमोर असलेल्या पत्र्याच्या शेडखाली फैजान मोमिन याच्या अत्यंत लहान आणि अस्वच्छ टेंपोमधे १ तांबड्या रंगाची गीर गाय आणि १ काळ्या-पांढर्या रंगाची खिलार गाय असे कत्तल करण्यासाठी बेदरकारपणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडले. (गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्याची आवश्यक स्पष्ट करणारी घटना ! – संपादक)
पोलीस आल्याचे कळताच दोघेजण पळून गेले. या प्रकरणी येथील खडक पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात काम करणारे पोलीस नाईक नामदेव गायकवाड यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या कारवाईत राहुल कदम आणि ‘गोरक्षा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्या’चे गोरक्षक यांचा सक्रीय सहभाग होता.