
कोल्हापूर – अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दसरा चौकात १ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. आंदोलनस्थळी २ ऑक्टोबरला जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाची मागणी जुनी असून मराठा समाजाला सर्वांगीण विकासासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी श्री. राजेंद्र तोरस्कर यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. सकल हिंदु समाजाने या उपोषण आंदोलनाला पाठबळ दिले आहे.’’
श्री. राजेंद्र तोरस्कर म्हणाले, ‘‘मराठा समाजाची न्याय्य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द