‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्‍ह्यातील नावे वगळण्‍यासाठी मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

सांगली जिल्‍ह्यातील खानापूर तालुक्‍यातील करंजे येथील गुन्‍ह्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

विटा (जिल्‍हा सांगली) – सांगली जिल्‍ह्यातील खानापूर तालुक्‍यातील करंजे येथील गुन्‍ह्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती आणि जमाती अत्‍याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत नोंद असलेल्‍या गुन्‍ह्यात खोटी नावे नोंद केल्‍याचा आरोप करत यातील संशयितांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात या गुन्‍ह्यातील नावे रहित करण्‍याविषयी आव्‍हान याचिका प्रविष्‍ट केली आहे.

करंजे येथे भटकी मळा परिसरात ३० जुलै २०२३ या दिवशी भूमीच्‍या वादातून परस्‍परविरोधी तक्रार विटा पोलीस ठाण्‍यात नोंद झाल्‍या होत्‍या. यातील सूर्यवंशी मळ्‍यातील पुरोगामी युवक संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष गोपीनाथ सूर्यवंशी आणि त्‍यांचे वडील भानुदास सूर्यवंशी यांची नावे ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्‍या अंतर्गत नोंदवण्‍यात आली होती. ही घटना घडली, त्‍या वेळी हे दोघेही कोल्‍हापूर येथे होते. त्‍यामुळे ‘त्‍यांची नावे राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्‍ह्यात नोंद केली आहेत’, असे म्‍हणणे मांडत सूर्यवंशी यांची उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.