
ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील वाडा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जातांना तोल जाऊन पडल्याने आकाश जाधव (वय २२ वर्षे) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गणेशपुरी पोलिसांनी रस्त्याचे काम करणारा ठेकेदार ‘मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स प्रा.लि.’ या आस्थापनावर गुन्हा नोंद केला आहे. (आणखी किती लोकांचे जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे ? अशा ठेकेदारांना काळ्या सूचीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)
US B-52 Bomber : अमेरिकेत विमान कोसळून ८ जण ठार
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !