सराला बेटाच्‍या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि नगर जिल्‍ह्यांतील भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या सराला बेट अर्थात् गोदाधामला जाण्‍यासाठी पक्‍के रस्‍ते अन् अंतर्गत सोयीसुविधांसाठी अनुमाने १५ कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ ऑगस्‍ट या दिवशी येथे केली.

सेतू कार्यालयातील अपहार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार ! – शंभूराज देसाई

सेतू कार्यालयातील अपहारप्रकरणी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. याची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्‍याकडे अहवाल दिला आहे; मात्र जिल्‍हाधिकारी सुटीवर असल्‍यामुळे १५ दिवस होऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

इस्रोच्‍या यशाचे श्रेय !

इस्रोच्‍या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्‍वतःच्‍या सत्ताकाळात शास्‍त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !

एन्.एम्.एम्.टी. प्रशासनाकडून तुर्भे येथील सर्व्‍हिस रोडवरील बस थांबा स्‍थलांतरित !

आय.सी.एल्. शाळेच्‍या जवळील सर्व्‍हिस रोडवरून एकही बस जात नसल्‍याने ‘तेथील बसथांबा मुख्‍य रस्‍त्‍यावर स्‍थलांतरित करण्‍यात यावा’, अशी मागणी प्रवाशांनी अनेकदा केली होती. या वृत्ताची नोंद घेत हा थांबा मुख्‍य रस्‍त्‍यावर स्‍थलांतरित करण्‍यात आला आहे.

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

पूर्वीच्‍या स्‍थितीत कोणताही आधुनिकपणा न आणता जुन्‍या पद्धतीने ऐतिहासिक वारसा असलेले पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली.

ठाणे येथे छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्‍याचे दहन !

बीड येथे झालेल्‍या उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या सभेत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी भुजबळ यांच्‍या विरोधात घोषणा देत त्‍यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्‍याचे २८ ऑगस्‍टला दहन केले.

कल्‍याण रेल्‍वेस्‍थानकात प्रवाशांच्‍या सामानाची चोरी करणार्‍या दोघांना अटक !

चोरीच्‍या प्रकरणात कठोर शिक्षा होत नसल्‍यानेच चोरांचे फावते, हे पोलिसांच्‍या कधी लक्षात येणार ?

लंपीचा संसर्ग रोखण्‍यासाठी गुरांचा बाजार आणि वाहतूक यांवर बंदी ! – जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश

लंपी रोगाचा संसर्ग जिल्‍ह्यातील इतर गोवंशियांना होऊ नये, यासाठी जिल्‍हाधिकारी तथा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण बुलढाणा येथील अध्‍यक्षा भाग्‍यश्री विसपुते यांनी गुरांचा बाजार आणि वाहतूक यांवर बंदी घातली आहे.

‘कॅसिनो’ नकोच !

सध्‍या युवावर्ग झटपट, कष्‍ट न करता पैसे मिळवण्‍याच्‍या नादात कॅसिनोसारख्‍या वाईट गोष्‍टींच्‍या नादी लागण्‍याची शक्‍यता असते. कालांतराने त्‍याचे व्‍यसनात रूपांतर होते आणि त्‍यामुळे कुटुंबच्‍या कुटुंब उद़्‍ध्‍वस्‍त झाल्‍याच्‍याही घटना घडल्‍या आहेत.

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.