गोवा : खनिज मालाच्या दर्जाच्या निश्चितीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले !

खनिज मालाचा दर्जा आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी सरकारने स्वतंत्रपणे तपासणी न करता मागील ‘लीज’धारकांनी पूर्वी सुपुर्द केलेल्या ‘खनिज योजना’ यांचा आधार घेतला आहे. यामुळे विरोधकांनी सरकाला धारेवर धरले.

गोवा शासन केंद्राकडे ध्वनीप्रदूषण नियमात शिथिलता देण्याची मागणी करणार !

ही शिथिलता घेतांना किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणारे संगीत वाजवले जाणार नाही, हे पहावे !

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७५ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यात आणीबाणी घोषित !

शरणार्थी मोठ्या प्रमाणात राज्यात घुसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगत हीली म्हणाल्या की, मॅसॅच्युसेट्स राज्य जवळपास ५ सहस्र ६०० कुटुंबे किंवा २० सहस्रांपेक्षा अधिक शरणार्थींना सहन करत आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘नमामि गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदी सुधार करण्‍याचा निर्णय !

केंद्र सरकारच्‍या ‘नमामि गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदीसुधार करण्‍याचा निर्णय ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ने घेतला आहे. राज्‍य सरकारच्‍या ‘प्रदत्त समिती’समोर झालेल्‍या बैठकीत अहवाल सादर झाला.

मराठा क्रांती मोर्चामुळे शीव-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी !

शेकडो कार्यकर्ते आल्‍याने शीव-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी ९ ऑगस्‍ट या दिवशी झाली.

जावेद अख्‍तर यांच्‍यावरील कारवाईच्‍या स्‍थगितीस सत्र न्‍यायालयाचा नकार !

८ ऑगस्‍ट या दिवशी यावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २४ ऑगस्‍ट या दिवशी होणार आहे.

खासगी शाळांतील १९ सहस्र ३९४ जागा रिक्‍त !

यंदा ८ सहस्र ८२३ शाळांमधील १ लाख १ सहस्र ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध आहेत.  नियमित विद्यार्थ्‍यांचे प्रवेश पूर्ण झाल्‍यानंतर प्रतीक्षा सूचीतील विद्यार्थ्‍यांसाठी ३ फेर्‍या राबवण्‍यात आल्‍या.

काँग्रेस-चिनी भाई भाई !

स्‍वदेशातील माहिती शत्रूराष्‍ट्राला पुरवणे काय किंवा पैसे घेऊन शत्रूराष्‍ट्राची धोरणे स्‍वदेशात राबवणे काय, हा विश्‍वासघात असतो. असा विश्‍वासघात काँग्रेस नेहमीच करत आली आहे. भाजपने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची ही प्रवृत्ती पुन्‍हा एकदा समोर आणली.

छातीत स्‍क्रू ड्रायव्‍हर भोसकून रिक्‍शाचालकाची हत्‍या !

दुकानासमोर रिक्‍शा उभी केल्‍याचा राग आल्‍याने दिनेश मौर्या यांनी रिक्‍शाचालक दिनेश चव्‍हाण यांच्‍या छातीत स्‍क्रू ड्रायव्‍हर भोसकला.