श्रीक्षेत्र माहूर येथे गोवंशियांच्या वाहतुकीची चौकशी करणारी हिंदु व्यक्ती धर्मांधांच्या मारहाणीत गंभीर घायाळ !

उद्दाम धर्मांध बिनधास्तपणे कायदा हातात घेतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय उरलेले नाही, हेच सिद्ध होते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! आता सरकारनेच गुंड धर्मांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली पाहिजे !

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या वतीने दैनिक ‘सनातन प्रभात’चे सुनील नांगरे यांना ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान !

‘‘पत्रकारांना पत्रकारांच्या समितीकडूनच सन्मान मिळणे, हे कौतुकास्पद असून पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून आपल्या जिल्ह्यातील पत्रकार हे नेहमी आपल्या लेखणीतून समाजाला योग्य दिशा आणि पीडित घटकाला योग्य न्याय देण्याचेही काम नेहमी करत असतात.’’

गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या

सदर कॅसिनोवर व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्‍यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे. 

गोव्यात किनारपट्टी भागातील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस

म्हापसा शहरात सर्वांत अधिक म्हणजे १४७ मि.मी. पाऊस पडला तर मुरगाव आणि दाबोली येथील केंद्रांत अनुक्रमे १४१.८ मि.मी. अन् १४१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील २ आठवड्यांत मोसमी वारे क्रियाशील रहाणार असून अधिक प्रमाणात पाऊस पडणार !

डॉ. प्रमोद सावंत भाजपच्या वतीने गोव्यातील सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री

सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री रहाण्याचा मान ! मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे सलग मुख्यमंत्री रहाण्याला २९ जून या दिवशी ४ वर्षे १०२ दिवस पूर्ण झाले आहेत.

भिकेला लागलेल्‍या भारतद्वेषीपाकची दयनीय स्‍थिती जाणा !

सौदी अरेबियाने पाकच्‍या सरकारी विमान वाहतूक आस्‍थापनाला अनुमाने ३९४ कोटी रुपये उधारी चुकवण्‍यास सांगितले आहे. जर पाकने ही रक्‍कम दिली नाही, तर पाकच्‍या ५० सहस्र नागरिकांना हज यात्रा करता येणार नाही.

नाशिक येथे सव्‍वा एकरवर साकारत आहे देशातील दुसरे कामाख्‍या देवी मंदिर !

आसाम राज्‍यातील गुवाहाटी येथील कामाख्‍या देवीचे देशातील दुसरे मंदिर नाशिक जिल्‍ह्यातील धारणगाव खडक (तालुका निफाड) येथे उभारले जात आहे. ऑगस्‍ट मासात ते भाविकांसाठी खुले होईल.

हिंदूंनो, स्वरक्षणार्थ तरी भग‍वंताची उपासना करा !

‘दंगली, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी संकटांतून सरकार, पोलीस आणि लष्कर वाचवू शकणार नाहीत. केवळ ईश्वरच वाचवू शकतो. यासाठी तरी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आतंकवाद्यांचा उदो उदो थांबवा !

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांनाही ‘आतंकवादी’ ठरवून कठोर शिक्षा दिल्‍यासच आतंकवाद्यांचे उदात्तीकरण थांबेल !