अनेक बाँबस्फोटांच्या प्रकरणी अटकेत असणारा जिहादी आतंकवादी अब्दुल नसीर मदनी याला बेंगळुरू पोलिसांनी कोच्ची येथे नेले होते. त्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असणार्या मुसलमानांनी त्याचे भव्य स्वागत केले. ज्याने घडवलेल्या बाँबस्फोटात ५८ जणांचा मृत्यू, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते, अशा आतंकवाद्याचे धर्मांध मुसलमानांकडून उदात्तीकरण केले जाते, याचा अर्थ ‘त्या सर्वांचा बाँबस्फोट आणि आतंकवाद यांना पाठिंबा आहे’, हे उघड होते. अशा मनोवृत्तीचे मुसलमान भारतात रहात आहेत; कारण भारत देश निधर्मी म्हणवला जातो. मुसलमान समाज अल्पसंख्य असल्याने त्याचे गोडवे गायले जातात, त्यांचे कोडकौतुक केले जाते, त्यांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा विनासायास पुरवल्या जातात. अर्थात् ही देण मुसलमान मात्र ओरबाडून घेतात आणि स्वतःला हवा तसा उद्दामपणा भारतात करतात. निधर्मी भारतातील सहिष्णु हिंदू हे सर्व मुकाटपणे सहन करतात.
‘आतंकवाद्याचे स्वागत केले जाणे लज्जास्पद आहे’, असे मत माजी पोलीस अधिकारी भास्कर राव यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीकडे व्यक्तही केले; पण आतंकवाद्यांच्या संदर्भात पोलिसांना विचारतो कोण ? भारतात आतंकवाद्यांवर कारवाई करण्याइतपत भारतीय पोलीसदल सक्षम नाही. मदनीच्या स्वागताचे वृत्त प्रसारमाध्यमांनी अगदी त्याचे गोडवे गात मांडले. जणू काही मदनी म्हणजे कुणी मोठी किंवा प्रसिद्ध, आदरणीय व्यक्ती असावी ! सामाजिक माध्यमांमध्येही ‘तत्त्वनिष्ठा’ नावाचा प्रकारच उरलेला नाही. भारतातील माध्यमे ही खरेतर भारताशी बांधील हवी; पण तसे होत नाही. उलट ती आतंकवादी, भ्रष्टाचारी, राष्ट्रद्रोही यांनाच विकली गेलेली असतात, असेच चित्र आहे. अशी माध्यमे राष्ट्राच्या उभारणीत कधीतरी मोलाचा वाटा उचलतील का ? केवळ आरोपी म्हणून एका ठिकाणी आतंकवाद्याला आणल्यावर स्वागताचा बडेजाव केला जाणे, हे विश्वगुरु ठरू पहाणार्या भारतासाठी लज्जास्पदच आहे. आतंकवाद्याचे स्वागत करणार्या आणि त्या स्वागताचे समर्थन करणार्या सर्वांनाच आतंकवादी ठरवायला हवे. आतंकवाद्यांच्या समवेत अशांनाही फासावरच चढवायला हवे; पण ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात असे कदापि होणार नाही. एरव्ही अन्य धर्मियांच्या संदर्भात अन्याय किंवा अत्याचार झाल्याचे तथाकथित वृत्त समजले की, असतील तेथून एक होऊन त्याविरोधात आवाज उठवणारे ढोंगी निधर्मीवादी आता या घटनेविषयी मात्र मूग गिळून गप्प बसतील, हे निश्चित !
उघड उघड राष्ट्रद्रोह !
वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथे ठार करण्यात आलेला आणि ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ‘अन्सार गझवट उल हिंद’ या संघटनेचा प्रमुख झाकीर मुसा याच्या अंत्ययात्रेत सहस्रोच्या संख्येने देशद्रोही धर्मांध जमले होते. या वेळी त्यांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि दगडफेकही केली. त्याला ठार करण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चेही काढण्यात आले होते. ‘लष्कर-ए-तोयबा’चा आतंकवादी सलीम पैरी याला चकमकीत ठार केल्यावर त्याच्या समर्थनार्थ एका पत्रकारानेही एक व्हिडिओ प्रसारित केला होता. आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेतही भारतविरोधी घोषणा दिल्या जाऊन आतंकवादाचे समर्थन आणि उदात्तीकरणच केले जाते. तहरीक-उल-मुजाहिदीन संघटनेचा आतंकवादी मुगीस अहमद मीर याला सैन्याने ठार केले होते. तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या सहस्रो मुसलमानांनी इसिसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. काश्मीरमध्येही आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी संपूर्ण गावच त्यात सहभागी झाले होते.
५० हून अधिक जणांचा जीव घेणार्यांच्या स्वागताच्या वेळी राष्ट्र संकटात जात नसते; पण ‘वन्दे मातरम्’चा जयघोष केला किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे यांचा उदोउदो झाला की, काही मंडळींना लगेच पोटशूळ उठतो. ‘राष्ट्र संकटात आहे’, अशी आरोळी ठोकली जाते. अशा वेळी स्वागत नाही, तर विरोधाचे हत्यारच उगारले जाते. वर्ष १९९३ च्या बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी देशद्रोही याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले होते. ज्याने अनेकांचे आयुष्य उद़्ध्वस्त केले, त्याच्या कबरीचे सुशोभीकरण केले जाणे हे संतापजनक नव्हे का ? असे करणार्यांनाही देशद्रोही ठरवायला हवे. याकूबला फाशी देण्यात आली, तेव्हाही त्याच्याविषयी नाहक सहानुभूती निर्माण करत काहींना मानवतावादाचा कळवळा आला. सामान्य जनता फाशीच्या बाजूने होती; पण याकूबप्रेमी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार यांच्यापैकी एकानेही या फाशीचे समर्थन केले नाही. फाशी दिल्याच्या दिवशी सकाळपासून प्रसारमाध्यमेही ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली देशात तेढ निर्माण करण्याचाच प्रयत्न करत होती. हे सर्व घृणास्पदच आहे. याकूबला फाशी देण्याच्या निकालाविषयी पहाटे ४ वाजेपर्यंत न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला होता. खरेतर एखाद्या आतंकवाद्याला वाचवण्यासाठी भारतात असा प्रकार प्रथमच झाला होता. हा राष्ट्रद्वेषच होय. थोडक्यात काय, तर गुन्हेगार किंवा आतंकवादी यांना निष्कारण सहानुभूती देणार्यांवर कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे. अन्यथा ‘राष्ट्रभक्त’ ही पदवी लयास जाईल आणि ‘राष्ट्रद्रोहीं’ना ‘राष्ट्रभक्त’ म्हणून मिरवण्याची संधी मिळेल.
भारताची कणखर भूमिका आवश्यक !
‘आतंकवाद्यांचे उदात्तीकरण कदापि सहन करणार नाही’, अशी कणखर भूमिका भारताने घ्यायला हवी. याकूब मेमन, झाकीर मुसा, अब्दुल नसीर मदनी यांच्या पिलावळी भारतात जन्म घेत आहेत. आतंकवाद्यांची पाठराखण करणार्यांमुळेच त्यांच्या मतपेटीचे सामर्थ्यही वाढत आहे. ‘इस्लाम खतरे में है ।’ असे वारंवार म्हणत राष्ट्रद्वेषाचा डाव साधून परकीय शक्तींना पाठबळ देण्याचा केला जाणारा प्रयत्न हाणून पाडायला हवा. भारतात आतंकवादाचा नव्हे, तर राष्ट्रप्रेमाचा उदो उदो होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांनाही ‘आतंकवादी’ ठरवून कठोर शिक्षा दिल्यासच आतंकवाद्यांचे उदात्तीकरण थांबेल ! |