खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
सोलापूर – सोलापूर येथून विमानसेवा तातडीने चालू करावी, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९० मीटर उंचीची चिमणी स्थानिक संघटनांनी न्यायालयीन लढा देत अवैध ठरवली होती. ही चिमणी सोलापूर विमानसेवा चालू होण्यात मुख्य अडथळा ठरली होती. त्यामुळे १५ जून या दिवशी ही चिमणी पाडण्यात आली आहे. केंद्र सरकारने ‘उड्डाण योजने’त सोलापूर शहराचा समावेश करून विमानसेवा चालू करण्याचे नियोजन केले होते.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सूतगिरण्या मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी निर्मिती होणारे टॉवेल, चादर, नॅपकिन संपूर्ण जगामध्ये निर्यात केले जातात. देशातील सर्वांत मोठ्या कारखान्यांचे जाळे सोलापूर जिल्ह्यात आहे. यासमवेतच डाळींब आणि द्राक्षे यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विमानसेवेत अडथळा ठरणारी चिमणी पाडली आहे. त्यामुळे ‘सोलापूरहून लवकरात लवकर विमान सेवा चालू करावी’, अशी मागणी त्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.