
इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्याचे अखंडत्व अबाधित राखण्याच्या उद्देशाने २९ जुलै या दिवशी राजधानी इंफाळमध्ये लक्षावधी मणीपुरी लोकांनी मोर्चा काढला. यामध्ये हिंदु मैतेई, मैतेई पांगाल, नागा, तसेच सनमाही या पंथांचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ख्रिस्ती आणि मुसलमान लोकांचाही मोर्च्यात सहभाग होता, अशी माहिती ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.
या ट्वीटमध्ये पुढे लिहिण्यात आले आहे की, चीन कुकी आतंकवादी, फुटीरतावादी, अवैध प्रवासी आणि अमली पदार्थांची तस्करी करणारे आतंकवादी यांच्या मणीपूरला तोडण्याच्या प्रयत्नांना मणीपुरी लोक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. आम्ही मणीपूरच्या शांतताप्रिय कुकी लोकांनाही आवाहन करतो की, त्यांनी कुकी आतंकवाद्यांचे कितीही भय असले, तरी त्यांचे फुटीरतावादी धोरण त्यागले पाहिजे.
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड