|
अलवर (राजस्थान) – येथील चौमा गावातील राजकीय उच्च माध्यमिक शाळेत हिंदु विद्यार्थ्याने कपाळावर टिळा लावून आल्याने त्याला शाळेतील मुसलमान विद्यार्थ्यानी मारहाण केली. तसेच मुसलमान मुलाच्या पालकांनीही शाळेत घुसून त्याला माहाण केली. या प्रकरणी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘मुस्लिम बनो नहीं तो जान से मार देंगे’: तिलक लगाकर स्कूल आए हिंदू छात्र को पीटा, तनाव के बाद राजस्थान के गाँव में भारी पुलिस बल तैनात#Rajasthanhttps://t.co/MuEnp1koHK
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 28, 2023
अ. २५ जुलै या दिवशी मुसलमान विद्यार्थ्यांनी या हिंदु विद्यार्थ्याला टिळा लावल्यावरून विरोध केला होता. दुसर्या दिवशी अन्यही काही हिंदु विद्यार्थी टिळा लावून शाळेत आले. तेव्हा मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. या वेळी मुख्याध्यापकांनी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापकांचे म्हणणे होते की, टिळा लावून आल्याने कुणाचाही आक्षेप असू नये.
आ. २७ जुलैला सकाळी पुन्हा यावरून शाळेत वाद झाला. या वेळी ७-८ मुसलमान विद्यार्थ्यांनी ११ वीमध्ये शिकणार्या हिंदु विद्यार्थ्याला धमकी दिली आणि त्याच्या कपाळावरील टिळा पुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा विद्यार्थी मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यास जात असतांना त्याला मुसलमान विद्यार्थ्यांनी मारहाण केली. याची माहिती मुसलमान विद्यार्थ्यांचा नातेवाईक युसूफ याला मिळाली आणि तोही तेथे पोचला आणि त्यानेही हिंदु विद्यार्थ्याला मारहाण केली आणि पळून गेला.
इ. हिंदु विद्यार्थ्याने म्हटले की, मुसलमान विद्यार्थी आणि त्यांचा नातेवाईक यांनी इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकी दिली. ‘जर मुसलमान बनला नाही, तर ठार मारू’, अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले.
संपादकीय भूमिका
राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट, असेच या घटनेतून स्पष्ट होते !शाळेत शिकणारे मुसलमान विद्यार्थी हिंदु विद्यार्थ्याला टिळा लावण्यास विरोध करतात, यावरून ते सर्वधर्मसमभावाचा कोणताही मान राखत नाहीत, हे स्पष्ट होते. हिंदु या आत्मघाती सर्वधर्मसमभावचे पालन का करत आहेत ? |