बीड – शिक्षिका पत्नी धर्मांध वाहनचालकाच्या प्रेमात पडल्याने पतीने आत्महत्या केली. पत्नी आणि तिचा धर्मांध प्रियकर यांच्यावर साडेतीन मासांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. चंद्रकांत सुरवसे हे असोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक, तर त्यांची पत्नी तेथे सहशिक्षिका म्हणून काम करत होती. त्यांच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करणारा मुस्तफा चाँद पाशा शेख याच्यात आणि सुरवसे यांच्या पत्नीत जवळीक झाली. शिक्षिका पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला होता. त्या मानसिक तणावातून तिच्या शिक्षक पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (लव्ह जिहादमुळे हिंदु कुटुंबाची किती प्रमाणात हानी होते ? हे या घटनेतून लक्षात येते. – संपादक)
पत्नी आणि चालक शेख मुस्तफा यांच्यातील प्रेमसंबंध वाढत असल्याचे पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने चालकाला कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्याला पत्नीने विरोध केला. ती मुस्तफासमवेत पती-पत्नीप्रमाणे वर्तन करू लागली. त्यांच्यातील अनैतिक संबंधांना कंटाळून चंद्रकांत सुरवसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरवसे यांच्या मुलांनी आई आणि चालक शेख मुस्तफा यांच्यातील अनैतिक संबंधांचे काही पुरावे पोलिसांना दिले. त्यानंतर हा गुन्हा नोंद झाला. (आधीच पोलिसांनी सखोल अन्वेषण का केले नाही ? – संपादक)