भक्तांच्या भावापोटी धावून येणारा श्री विठ्ठल !

संत सखुबाई यांच्या विठ्ठलदर्शनाच्या तीव्र ओढीमुळे साक्षात् विठ्ठलानेच यांच्या रूपात स्वतः खांबाला बांधून घेतले आणि त्यांना पंढरपूरला पाठवले !

श्री विठ्ठलाला करायच्या प्रार्थना !

हे विठ्ठला, तू भक्तीचा भुकेला आहेस. तुझ्या चरणांशी येण्यासाठी तुझी भक्ती तळमळीने कशी करायची, हे तूच मला शिकव, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

वारकर्‍यांचा भाव !

‘पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ‘माऊली’ कशी काळजी घेतात’, असाच भाव वारकर्‍यांच्या बोलण्यातून जाणवतो.

‘श्रीकृष्णाची आरती हीच विठोबाची आरती’, असा विचार आल्यावर दोघेही एकमेकांपुढे दिसणे आणि ‘हा मनाचा खेळ असल्या’चा विचार आल्यावर विठोबाच्या ओठाला लोणी लागलेले दृश्य आरती पूर्ण होईपर्यंत दिसणे

आरती चालू असतांना ‘विठोबाची आरती म्हणावी’, हा विचार आला. ‘ती न बघता म्हणता येईल कि नाही’, असे वाटले आणि लगेच ‘श्रीकृष्णाची आरती हीच विठोबाची  आरती’, असा विचार आला.

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाच्या माध्यमातून आलेल्या अकल्पित दैवी अनुभूतीतून अनुभवलेली ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यमय प्रीती !

देवाने सूक्ष्मातून प्रसाद देणे, नंतर एका साधिकेने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा प्रसाद दिल्यावर सूक्ष्मातून मिळालेल्या प्रसादाची आठवण येणे

श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील मूर्तीचे वर्णन मी बर्‍याच जणांकडून ऐकले होते. त्यामुळे ‘त्या मनोहर मूर्तीचे एकदा तरी दर्शन मिळावे’, असे मला वाटत होते. माझ्या मनात बरेच दिवस हा विचार घोळत होता.

सूक्ष्मातून पंढरपूरला गेल्यावर मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती सजीव झाल्याचे जाणवणे, मूर्तीतून पांढरा प्रकाश संपूर्ण परिसरात पसरणे, त्याचे पिवळ्या रंगात रूपांतर होऊन नंतर निळ्या रंगाच्या कणात विघटन होणे आणि त्या वेळी देहभान विसरून जाणे

एकदा आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच आपोआप मी सूक्ष्मातून पंढरपूरला गेलो. तत्पूर्वी पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती सजीव झाल्याचे मला अंतरंगात जाणवले.