‘द केरळ स्टोरी’च्या सदस्याला धमकी !

सत्याला विरोध होतोच, हे प्रकर्षाने दर्शवणारी घटना ! सत्य दाखवणारे अशा धमक्यांना घाबरत नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

तमिळनाडूमध्ये पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर एन्.आय.ए.च्या धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) संदर्भात एका प्रकरणी तमिळनाडू राज्यात ६ ठिकाणी धाडी घातल्या.

देवद (पनवेल) येथे श्री गणपति, श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

१२ मे या दिवशी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटसमोर श्री गणपति, श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरील बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल येथील राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बंदी घातली आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड !

येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र शेळके !

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

देहू देवस्थान संस्थानने केली पालखी मार्गाची पहाणी !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १० जून २०२३ या दिवशी प्रस्थान होणार आहे. त्या दृष्टीने देहू संस्थांनचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख आदींनी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची तीन टप्प्यांत (पालखी विसावा, पालखी सोहळा मुक्काम स्थळ आणि पालखी मार्ग) पहाणी केली.

महापालिकेने विनाकारण शिल्पांचे सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये !

एकाच रंगात सर्व पुतळे रंगवून पुतळ्यांचे मूळचे शिल्पसौंदर्य नष्ट होत आहे. या रंगामुळे पुतळ्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे, असे म्हणत पुण्यातील अनेक शिल्प कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याच्या प्रयत्नात माझाही सहभाग असेल ! – शरद पवार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट होत असतांना मी बाजूला होणे योग्य नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

गोहत्या करणार्या दौंड (पुणे) येथील टोळीवर तडीपारीची कारवाई, ७ धर्मांध तडीपार !

दौंड शहर आणि परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक आणि विक्री करणार्या टोळीतील ७ सदस्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी ही कारवाई केली आहे.