२ जणांना अटक
चेन्नई (तमिळनाडू) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) संदर्भात एका प्रकरणी तमिळनाडू राज्यात ६ ठिकाणी धाडी घातल्या. येथून २ जणांना अटक करण्यात आली आहे. यात मदुराई येथील अध्यक्ष महंमद कैसर आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया’चा जिल्हा सचिव आदिक अली यांचा समावेश आहे. (आता ‘सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया’ या पक्षावरही बंदी घातली पाहिजे ! – संपादक) गेल्या वर्षभरात या प्रकरणात पोलिसांनी १२ हून अधिक सदस्यांना अटक केली आहे. हे प्रकरण धर्माच्या आधारे कट रचणे आणि अवैध कारवाया करण्याचे आहे.
National Investigation Agency (NIA) today arrested five accused linked to Tamil Nadu PFI criminal conspiracy case. With the move, a total of 15 people have been arrested by the NIA in the case. These arrests followed searches conducted by the agency at six locations in Theni,… pic.twitter.com/tmlbvYVBsO
— ANI (@ANI) May 9, 2023